माझा होशील ना’ फेम सई अर्थातच अभिनेत्री गौतमी देशपांडेने आपल्या अभिनयाने सर्वांचीच मनं जिंकलीयेत. या मालिकेमुळे गौतमीला प्रचंड लोकप्रियता मिळालीये. उत्तम अभिनेत्री सोबतच ती एक उत्तम गायिका सुद्धा आहे. आजपासून श्रावण महिन्याला सुरूवात झालीये आणि यानिमित्त गौतमीने तिच्या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये ती श्रावण महिन्यांच्या निमित्ताने गाणं गाताना दिसतेय. या व्हिडीओमधून तिने आपल्या आवाजाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं आहे. श्रावण महिन्याची सुरवात आणि गौतमीचा हा सुरेल अंदाज हे समीकरण चांगलच जुळून आलयं. हा व्हिडीओ शेअर करत तिने ‘तांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला’ असं कॅप्शन दिलं आहे. तिचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूप पसंतीस पडलाय.
Snehalvo
#lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber